प्रथम रस्सम् पावडर तयार करण्यासाठी - तूरडाळ, हरबरा डाळ, उडीद डाळ प्रत्येकी एक चमचा, १ वाटी धणे, १/२ वाटी जिरे, २ चमचे मिरे, ७ - ८ लाल मिरच्या, हिंग, सूंठ.
चिंच, गूळ, मीठ, कढीपत्ता, १ - २ लाल मिरची, ५ - ६ टोमॅटो, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, आलं.
कृती :
रस्सम् पावडर करण्यासाठी धणे, जिरे, मिरे, लाल मिरच्या व तूरडाळ, हरबरा डाळ, उडीद डाळ हे सर्व साहित्य भाजून घ्यावे. त्यात हिंग, सूंठ घालून मिक्सरवर बारीक पावडर करून घ्यावी.
टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. तेलाची फोडणी मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून करावी, त्यातच लाल मिरची, आलं किसून घालावे व तयार रस्सम् पावडर घालून टोमॅटो घालावेत. थोडा वेळ परतून त्यात चिंचेचा कोळ, पाणी घालावे. मीठ व गूळ घालून उकळावे.
रस्सम् पावडर तयार करूनच ठेवली म्हणजे ऐनवेळी वेळ वाचतो व इतरही काही पदार्थात तो मसाला घालता येतो.
No comments:
Post a Comment