१ वाटी चिंचेचा कोळ, १/२ वाटी गूळ, तिखट २ टीस्पून, मीठ चवीनुसार, हिंग, दालचिनीपूड १/२ टीस्पून व लवंग पूड १/४ टीस्पून, १ चमचा किसलेले आलं, पाव वाटी तूप, जिरे, किसलेले कोरडे खोबरे २ चमचे, कोथिंबीर.
कृती :
१ ते दीड वाटी चिंच अर्धा तास भिजवावी. नंतर त्या चिंचेचा पाणी घालून - घालून पूर्ण कोळ काढून घ्यावा. कढईत तूप घालून जिर्याची फोडणी करावी, त्यातच हिंग, दालचिनीपूड व लवंगपूड, किसलेले आलं घालून चिंचेचा कोळ घालावा. हवे तेवढेच पाणी घलावे, मग तिखट, मीठ, गूळ घालून हलवावे. खोबरे, कोथिंबीर घालून उकळावे.
हे सार नुसते प्यायला पण चांगले लागते अथवा मुगाच्या खिचडीबरोबर, भाताबरोबर चांगले लागते.
No comments:
Post a Comment