दीड वाटी हरभर्याची डाळ, दीड वाटी चिरलेला गूळ, वेलदोडयाची पूड / जायफळाची पूड, तीन वाट्या कणिक ( गव्हाचे पीठ ), चवीपुरते मीठ, तेल, चिमुटभर खाण्याचा सोडा.
कृती :
हरभर्याची डाळ धुवून पाणी घालून त्यात चिमुटभर खाण्याचा सोडा घालावा व कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ चाळणीवर ठेवून पाणी निथळून टाकावे. जाड बुडाच्या पातेल्यात डाळ घेऊन डावाने घोटावी. त्यात गूळ घालून परत शिजवून घ्यावे. पुरण तयार झाल्यावर खाली उतरवून त्यात वेलदोडयाची किंवा जायफळाची पूड घालावी. हे पुरण पुरणयंत्रातून बारीक करण्याची आवश्यकता नाही. पुरण शिजवताना त्यात डाव उभा ठेवून बघावा, तो जर बाजूला पडला तर अजून पुरण शिजले नाही असे समजावे. पण जर तो डाव खडा उभा राहिला तर पुरण तयार झाले.
कणकेमध्ये मीठ घालून तेल लावून पोळीप्रमाणेच भिजवून ठेवा. त्या पीठाचे छोटे - छोटे गोळे करावेत. पुरी लाटून त्यात मधोमध पुरण घालून समोरासमोरच्या बाजू एकमेकांवर येतील अशा पद्धतीने घड्या घालून, आयताकृती दींड तयार करून, मोदक पात्रात ही दींड १५ - २० मिनिटे उकडून घ्यावेत. किंवा एका पातेल्यात पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवावी, चाळणीला थोडे तेल लावून त्यावर दींड ठेवून वर ताट झाकूनही उकडून घेता येतात. तुपाबरोबर खायला छान लागतात. नागपंचमीचे दिवशी हा पदार्थ केला जातो.
धोंड्याच्या महिन्यात ( अधिक महिन्यात ) याचप्रकारे, फक्त गोल आकाराचे धोंडे करून देवाला नैवेद्य दाखवला जातो.
No comments:
Post a Comment