५ - ६ पिवळीधमक लिंबं, १ वाटी साखर, १/२ वाटी खारकेचे तुकडे व बेदाणे एकत्रित, २ - ३ टेबलस्पून मीठ, २ टेबलस्पून जिरेपूड, १/४ वाटी लाल तिखट.
कृती :
लिंबं बारीक चिरून घ्या. सगळ्या बिया काढून टाका. कुकरमध्ये खाली पाणी घालून एका डब्यात फोडी घालून त्यात ठेवा. शिट्टी काढून टाका व मोठ्या गॅसवर ५ मिनिटे कुकर ठेवा. गॅस बारीक करून परत ७ - ८ मिनिटे शिजू द्या. गॅस बंद करून फोडी थंड झाल्यावर त्यात साखर व मीठ घालून ढवळा. मिश्रण काचेच्या बरणीत ठेवा. ३ - ४ दिवस रोज मिश्रण ढवळा. मधासारखा पाक दिसायला लागल्यावर त्यात तिखट, जिरेपावडर, ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे घालून व्यवस्थित ढवळा. साधारण ८ - १० दिवसात हे लोणचे छान मुरते. या लोणच्याला पाण्याचा हात मात्र लागू नये याची दक्षता घ्या.
No comments:
Post a Comment