दीड वाटी बारीक रवा, १/३ वाटी तूप, १/२ वाटी दही, ३/४ वाटी दूध, १ वाटी पिठीसाखर, १/२ टीस्पून बेकींग पावडर, १/३ टीस्पून सोडा, १/३ टीस्पून वेलची पूड, २ चिमुटभर मीठ, १/३ वाटी ड्रायफ्रूटस्, टूटी फ़्रूटी.
कृती :
रवा जाड असल्यास मिक्सरवर बारीक करून घ्यावा. मग रवा, मीठ, वेलची पूड, साखर, तूप हे एकत्र करून त्यात दही व घेतलेल्या दूधातील अर्धे दूध घालून हलवावे. गुठळ्या राहू नयेत. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवावे. कुकरची शिट्टी काढून आतील स्टँड बुडेल इतपत पाणी घालून झाकण ठेवून उकळत ठेवावे. तोपर्यंत मिश्रण थोडे घट्ट झालेले असेल. त्या मिश्रणामध्ये उरलेले दूध घलावे व थोडे ड्रायफ्रूटस्, टूटीफ्रूटी, बेकींग पावडर, सोडा घालून चांगले फेसावे. एखद्या पसरट aluminium भांड्यात किंवा कुकरच्याच भांड्याला सगळीकडून तूप लावून तळाला उरलेले ड्रायफ्रूटस् , टूटी फ़्रूटी घालून त्यावर मिश्रण घालावे. कुकरमधील पाणी उकळल्यावर झाकण काढून त्याची रींग काढून आतील स्टँडवर भांडे ठेवावे. कुकरचे झाकण आतून नीट पुसून घ्यावे. ( बाष्प तयार झालेले असेल, ते मिश्रणावर पडू नये ) परत झाकण घालून मंद आचेवर २० मिनिटे ठेवावे व नंतर मध्यम फ्लेमवर ५ मिनिटे ठेवावे. नंतर झाकण काढून टूथपिक घालून झाले की नाही ते बघावे व परत कुकरचे झाकण न घालता १ मिनिट ठेवावे. मग गॅस बंद करावा. थोड्या वेळाने गार झाल्यावर भांडे बाहेर काढावे. भांड्यावर एक ताटली ठेऊन ते उलटे करावे व भांडे अलगद काढून घ्यावे.
No comments:
Post a Comment