बारीक रवा, बेसन, १/२ वाटी गूळ, १ ग्लास पाणी, तळण्यासाठी तेल.
कृती :
गूळामध्ये पाणी घलावे. गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यावा. मग त्या गुळाच्या पाण्यात बसेल एवढे बेसन व रवा ( रव्याचे प्रमाण कमी, बेसनाच्या १/४ ) घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. अर्धा तासानंतर त्याच्या जरा मोठ्या पातळ पुर्या लाटून कढईत मंद आचेवर तळून घ्याव्यात . या पुर्या कडक होतात. पण खुसखुशीत छान लागतात.
बहुतेक घरांमध्ये देवीच्या नवरात्रात अष्टमीदिवशी या कडाकण्यांचा नैवेद्य असतो.
No comments:
Post a Comment