चांगली कोवळी व ताजी ३० विड्याची ( खाऊची ) पाने, पाव वाटी मसाला सुपारी ( बिनसुपारीची ), २ चमचे गुलकंद, ४ चमचे सुके खोबरे, पाव टीस्पून काथपूड, अर्धा चमचा वेलचीपूड, लवंगा ४-५, पाव वाटी बडीशोप, गुंजेचा पाला ( आवडत असल्यास ), २ चमचे साखर.
कृती :
सर्व साहित्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी - जास्त करता येते. विड्याची पाने स्वच्छ पुसून बारीक चिरून घ्यावीत. मग मिक्सरमध्ये प्रथम लवंगा, साखर, बडीशोप, सुके खोबरे घालून बारीक करून, त्यात इतर साहित्य व चिरलेली पाने घालून बारीक करावे. विड्याच्या पानात घालण्यासारखे इतरही काही जिन्नस यात घालू शकता.
हे तयार तांबूल जेवणानंतर खावयास दिल्यास विडा खालल्याचा आनंद घेता येतो व सणावारी इतर धावपळीमुळे विडे तयार करण्याचा वेळही वाचतो.
No comments:
Post a Comment