२ वाट्या केशर रवा, आंबट ताक २ वाट्या, मीठ, १ मोठा कांदा ( टोमॅटो सुद्धा घालू शकता ), कढीपत्ता, २ हिरव्या मिरच्या, हिंग, फोडणीसाठी तेल, मोहरी, उडीद डाळ, खोबरे कोथिंबीर.
कृती :
केशर रवा कढईत खमंग भाजून ताटात काढून बाजूला ठेवावा. कढईत फोडणीसाठी तेल घालावे. मोहरी, उडीद डाळ घालून मिरच्यांचे तुकडे, हिंग, कढीपत्ता घालावा व कांदा घालून परतून घ्यावा. टोमॅटो आवडत असल्यास कांद्याबरोबर टोमॅटो परतून घ्यावा. त्यातच १ वाटी पाणी घलावे व ताक घालून उकळी येऊ द्यावी. मग मीठ घालून, भाजलेला रवा घालून ढवळावे. गॅस बारीक करावा. हळूहळू ते घट्ट होईल. सर्व्ह करताना खोबरे कोथिंबीर वरून घालावे.
नेहमीच्या पांढर्या रव्यापेक्षा हा रवा पौष्टिक असतो.
No comments:
Post a Comment