Friday, January 16, 2015

कणकेचे लाडू : ( Kanakeche Ladoo - Wheat flour Ladoo )

साहित्य :
           ४ वाटया   कणिक, १ १/२ वाटया बेसन, ३ वाटया जाड पोहे, किसलेले कोरडे खोबरे पाव वाटी, खारीक पावडर पाव वाटी, खसखस पाव वाटी, पांढरे तीळ पाव वाटी, गूळ किसून ३ वाट्या, तूप, वेलदोड्याची पूड.

कृती :
         कणिक तूपावर चांगली बदामी रंगावर भाजावी. बेसन पण भरपूर तूपावर भाजून घ्यावे. जाड पोहे भाजून हाताने चुरावे किंवा मिक्सरवर जाडसर करावे. खोबरे, खसखस, तीळ भाजून बारीक करून घ्यावे. हे सर्व साहित्य आणि खारीक पावडर एकत्र करावे. त्यात गूळ मिसळून खूप मळावे. ( गूळ गरम करून पातळ केला तरी चालेल, पण तो जास्त वेळ गॅसवर ठेवल्यास मिश्रण कोरडे होऊ शकते ). गूळाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त घेऊ शकता. त्यात वेलदोड्याची पूड घालून लाडू वळावेत.

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. छानच, पौष्टिक आहे. पण तुपाचे प्रमाण किती घ्यायचे कळले नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. साधारण अर्धा ते पाऊण वाटी, कणिक नीट भाजता येईल इतपत घ्यावे. बेसनच्या लाडवा सारखे घ्यावे.

      Delete
    2. साधारण अर्धा ते पाऊण वाटी, कणिक नीट भाजता येईल इतपत घ्यावे. बेसनच्या लाडवा सारखे घ्यावे.

      Delete