साहित्य :
१।२ वाटी मेथ्या (मेथी दाणे), ४ वाटया कणिक,पाव वाटी खारीक पावडर, १।२ वाटी खिसलेले खोबरे, ३ वाटया पिठीसाखर, पाव वाटी खसखस, वेलदोडयाची पूड, २ वाटया तूप.
कृती :
मेथ्या मिक्सरवर बारीक करून घ्याव्यात. कणिक तूपावर खरपूस भाजून घ्यावी. खसखस भाजून बारीक करून घ्यावी. खोबरे पण चांगले भाजून हाताने चुरून घ्यावे. मग मेथ्या, कणिक, खसखस, खोबरे, खारीक पावडर, वेलदोडयाची पूड हे सर्व साहित्य एकत्र करावे व त्यात त्या मिश्रणाच्या अर्धी पिठीसाखर घालावी. त्याचे लाडू वळताना ज़र तूप कमी वाटले तर वरून थोड़े तूप घालून लाडू वळावेत. आवडत असल्यास बेदाणे घालावेत.
हे लाडू बाळंतिणीसाठी अतिशय उपयुक्त आहेत.
No comments:
Post a Comment