१ वाटी बेसन, २ वाटया दही, ३ वाटया साखर, वेलदोडयाची पूड, पाव वाटी पिठीसाखर, केशरी रंग.
कृती:
बेसन, दही, साखर एकत्र कढईत घेऊन गॅसवर शिजवावयास ठेवावे. सारखे हलवत रहावे.
घट्ट होत आले की थोडा केशरी रंग व वेलदोडयाची पूड घालून मिश्रण आळून येण्यासाठी थोड़ी पिठीसाखर घालावी,पोळपाटाला तूप लावून त्यावर मिश्रण ओतावे. त्यावर प्लास्टिक पेपर ठेवून लाटण्याने लाटावे. वड्या पाडाव्यात.
No comments:
Post a Comment