२ वाटया हरबरा डाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, तेल फोडणीसाठी, मोहरी १ चहाचा चमचा, १/२ चहाचा चमचा हिंग, हळद, मीठ आवडीनुसार, नारळाचा चव, कोथिंबीर, साखर, २ चमचे लिंबाचा रस, कढीपत्ता ५-६ पाने.
कृती:
हरबरा डाळ ४ तास भिजवावी. नंतर डाळ पाण्यातून उपसून काढून, मिक्सरवरून हिरव्या मिरच्या व डाळ एकत्र थोडी जाडी - भरडी करावी. कढईमधे फोडणीसाठी तेल घालावे. त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर कढीपत्त्याची पाने घालावीत व १/२ चहाचा चमचा हिंग घालावा, हळद घालावी. मग त्यात बारीक केलेली डाळ घालून ती पूर्णपणे कोरडी होईपर्यंत मंद आचेवर झाकण ठेवून परतावी. मग त्यात मीठ व १ चमचा साखर घालून हलवावे. त्यात लिंबाचा रस घालून हलवावे.
डीशमधे देताना वरून कोथिंबीर व नारळाचा चव घालावा.