१ वाटी गूळ, २ वाट्या कणिक, पाव वाटी रवा, ४ चमचे तांदूळपिठी, चिमूटभर मीठ.
कृती :
१ गूळ ३ वाट्या पाण्यात पूर्णपणे विरघळवून घ्यावा. त्यात कणिक, रवा, तांदळाचे पीठ घालून नीट मिसळून घ्यावे. गुठळ्या राहू देऊ नवे. मग त्यात परत पाणी घालून पीठ धीरडी करण्या इतपत पातळ करून घ्यावे व मग मीठ घालून हलवावे. तव्याला तेल लावून पातळ धीरडी करावीत. गॅस मंद असावा. दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्यावे. खूप मऊ व चविष्ट लागणारी ही धीरडी सगळ्यांना आवडतील. ऐनवेळेस पटकन खायला करण्यासारखा हा पदार्थ आहे.